जडणघडणीत संस्कारांचा वाटा मोठा
By Admin | Updated: January 23, 2017 03:18 IST2017-01-23T03:18:51+5:302017-01-23T03:18:51+5:30
व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यामागे त्याच्यावर आईच्या संस्कारांचा झालेला मोठा वाटा असतो. लहानपणापासून आईने चालता

जडणघडणीत संस्कारांचा वाटा मोठा
पुणे : व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यामागे त्याच्यावर आईच्या संस्कारांचा झालेला मोठा वाटा असतो. लहानपणापासून आईने चालता बोलता दिलेल्या आयुष्याच्या धड्यांमुळेच कठीणवेळी आपण कसे वागावे याचे भान आपणांस मिळत असते, असे मत होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे कर्तबगार मातेस देण्यात येणारा ‘आदर्श आई पुरस्कार’ दिल्ली येथील तिहार जेलमधील कैद्यांच्या मुलांसाठी व भारतातील अनाथ मुलांच्या परदेशी दत्तक प्रक्रियेच्या समन्वयक म्हणून पस्तीस वर्षे काम करत असलेल्या गिरिजा आनंद सप्रे यांना बांदेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी बांदेकर बोलत होते.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर आदी व्यासपीठावर होते.
सूत्रसंचलन प्रज्ञा गोडबोले यांनी केले. प्रास्ताविक रंगत-संगत प्रतिष्ठानचे अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. तर श्यामची आई फाउंडेशनचे भारत देसडला यांनी आभार
मानले़ (प्रतिनिधी)