सणसरला 76 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:16 IST2021-01-16T04:16:03+5:302021-01-16T04:16:03+5:30
सणसर ग्रामपंचायतीचे एकूण सहा वार्ड आहेत या 6 वार्ड मधून 17 सदस्यांसाठी 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सहा वार्ड ...

सणसरला 76 टक्के मतदान
सणसर ग्रामपंचायतीचे एकूण सहा वार्ड आहेत या 6 वार्ड मधून 17 सदस्यांसाठी 50 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सहा वार्ड मधून एकूण नऊ हजार पाचशे सोळा मतदारांचे मतदान आहे. एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी 76 टक्के इतकी झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 89 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी 37 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले तर दोन अर्ज छाननीत बाद झाले होते.
अनेक मातब्बर उमेदवार निवडणुकीस उभे होते. यात छत्रपती कारखान्याचे विद्यमान संचालकांसह तीन माजी सरपंच, दोन माजी सरपंचांचे पती यांचा समावेश उमेदवारांमध्ये आहे. . या उमेदवारांना आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाच्या जोरावर मतदान मिळणार आहे. 18 तारखेला सर्व उमेदवारांचे निकाल जाहीर होणार आहे.
मतदान करण्यासाठी मतदारांनी रंगा लावून शांततेत मतदान केले