संजीवन समाधिसोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: November 10, 2014 22:54 IST2014-11-10T22:54:19+5:302014-11-10T22:54:19+5:30
संतश्रेष्ठ जगदगुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

संजीवन समाधिसोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
आळंदी : संतश्रेष्ठ जगदगुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर भाविकांना तसेच नागरिकांना याचा फटका बसू नये, यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधी सोहळ्याला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. माऊलींचा संजीवन सोहळा 2क् नोव्हेंबरला पार पडणार आहे. तत्पूर्वी अलंकापुरीत देवस्थानतर्फे आणि नगरपरिषदेकडून जय्यत तयारी केली जात आहे.
सोहळ्यापूर्वी आळंदी शहराच्या संपूर्ण परिसरात जेटिंग मशिनद्वारे औषधांची फवारणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शहरातील बंद व खुल्या गटारांमध्ये मशिनमार्फत औषधांची फवारणी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य ठिकाणी वाढलेले गवत कामगारांच्या साह्याने नगरपालिकेने काढले आहे. कार्तिकी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून भाविकांचे आरोग्य रोगमुक्त ठेवण्यासाठी चार टप्प्यांत प्राधान्य देऊन काम केले जाणार आहेत.
कार्तिकी सोहळ्याला अलंकापुरीत लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे गर्दी
होऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता
पसरते. यामुळे भाविकांना प्रदक्षिणा घालत असताना रुमाल तोंडाला लावण्याची वेळ ओढवते.
भाविकांच्या या समस्येचा विचार करून परिसर केरमुक्त तसेच स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेकडून विषेश काळजी घेण्यात येणार आहे.
शहराची सफाई व रस्त्यावरील केरकचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेकडून एकूण 16क् कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिवसातील तीन पाळ्यांमध्ये हे
काम केले जाणार आहे.
डास, माश्या तसेच विविध रोगजंतूंपासून भाविकांना कुठल्याही प्रकारचा आजार किंवा त्रस होऊ नये यासाठी विशेष खबरदारी म्हणून शहरातील प्रमुख रस्ते, गटारी, घाट, कचरा उचलल्यानंतरची जागा आदी ठिकाणी फॉगिंग मशिनच्या साह्याने फवारणी करण्यात येणार
आहे. दुपारच्या दरम्यान डेंग्यूचे
डास जास्त प्रमाणात चावा घेत असल्याने दुपारी दोननंतर
यंत्रच्या साह्याने शहरात औषधांची फवारणी करण्यात केली जाणार
आहे. यामुळे यावर्षी भाविकांची या त्रसापासून मुक्तता होण्यास मदत होणार आहे.
सोहळ्यादरम्यान भाविकांना
425 पक्की स्वच्छतागृहे तयार करण्यात आली आहेत. नगरपरिषदेकडून व देवस्थान समितीकडून प्रत्येकी 1क्क्
स्वच्छतागृहे, फिरती मोबाईल स्वच्छतागृहे अशी एकूण 65क् स्वच्छतागृहे तैनात करण्यात
आली आहेत. तत्पूर्वी,
डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण
आरोग्य, पंचायत समिती आरोग्य विभाग तसेच हिवताप निमरूलन
केंद्र यांच्या वतीने याची
खबरदारी म्हणून विशेष
प्रतिबंधात्मक जनजागृती करणा:या प्रतींचे शहरात वाटप करण्यात
आलेले आहे. (वार्ताहर)
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी उत्सव सात दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोप:यातून असंख्य भाविक भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुखसोहळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत दाखल होणार आहेत. अनेक गावांमधून विविध संतांच्या येत असलेल्या दिंडय़ा, पालख्या दोन-तीन दिवसांच्या अंतरावर आलेल्या आहेत.कार्तिकी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी विविध उपयोगी घटकांची तरतूद करण्यात आली आहे. डेंग्यू रोगाचा धोका लक्षात घेऊन तो नियंत्रित ठेवण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत.
- विनायक औंधकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद