शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

थकीत वीजबिलांची वसुली मोहीम आक्रमकपणे राबवा : संजय ताकसांडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 19:04 IST

पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई

पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात थकीत वीजबिलांच्या वसुलीची स्थिती विदारक आहे.त्यामुळे सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वीज बील वसुलीची मोहीम आक्रमकपणे राबवा, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले. महावितरणच्या प्रकाशभवनमध्ये गुरूवारी संजय ताकसांडे यांनी पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार अभियंते,अधिकारी व जनमित्रांशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) शंकर तायडे, महाव्यवस्थापक अलोक गांगुर्डे,अधीक्षक अभियंते सुंदर लटपटे, पंकज तगलपल्लेवार, राजेंर्द्र पवार, उपमहाव्यवस्थापक एकनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.संजय ताकसांडे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र,त्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी वाढत चालली आहे. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या मानसिकतेतून संबंधितांनी काम करावे.तसेच संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी,असे निर्देश त्यांनी दिले.वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर निष्काळजीपणा करणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्वच १२ विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करावी. पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ७ लाख ३ हजार थकबाकीदारांकडून १३३ कोटी ५२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे,असे या बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण