शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
4
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
5
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
6
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
7
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
8
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
9
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
10
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
11
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
12
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
13
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
14
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
15
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
16
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
17
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
18
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
19
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
20
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार

नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 03:29 IST

‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले.

मुलाखतीच्या शेवटी एक रँपिड फायर राऊंड घेऊयात, ज्यात काही नावं सांगतो. त्यांच्याविषयी एक चांगला गुण सांगायचा आणि एक सल्ला द्यायचा असे सांगताच, झालं ना आता? असं राऊत म्हटले. जेवणानंतर ‘स्वीट डिश’ हवी ना? असं प्रत्युत्तर अतुल कुलकर्णी यांनी देताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले.नरेंद्र मोदीमोदी हे प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्याइतकी मेहनत कुणीच घेणार नाही. त्यांना मी काय सल्ला देणार? त्यांना सल्ला द्यायचा अधिकार मला नाही. फक्त पत्रकार या नात्याने सांगू इच्छितो, की आसपासच्या आपल्या सहकाऱ्यांकडेही लक्ष द्यायला पाहिजे.अमित शहाप्रखर राष्ट्रभक्त आहेत. त्यांनी जे काही निर्णय घेतले उदा : कलम ३७० असो ते कौतुकास्पद आहे. ते खूप हिमतीचे आहेत. पण देशात लोकशाही आहे हे त्यांनी मान्य केले पाहिजे. अनेक विषयांत विरोधी पक्षाचे मत समजूनघेतले पाहिजे.नितीन गडकरीगडकरी यांनी दिल्लीत जास्त लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. ते नागपूरमध्येच बसून भाषण करतात. त्यांची गरज दिल्लीत जास्त आहे. कुणीतरी महाराष्ट्राच्या नेत्याने दिल्लीत ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकरबाळासाहेबांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. पण भाजपला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये.राहुल गांधीते मनाने खूप चांगले आणि निष्कपट आहेत. पण किमान १५ तास त्यांनी पक्ष कार्यालयात बसणं गरजेचं आहे.असदुद्दीन ओवीसीउत्तम कायदेपंडित आहेत. त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. लोक सहमतदेखील होतात. पण जे आंबेडकर यांच्यासंदर्भात म्हणालो तसे त्यांनीही व्होटकटर मशिनची भूमिका बदलायला पाहिजे.अजित पवारहे सध्याच्या मंत्रिमंडळातले अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत. कामाला वाघ असा मंत्री बघितला नाही. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आणि हिमतीने काम करणारा माणूस आहे. अजित पवारचे तोंड खराब आहे, असे तेही म्हणतात. पण राजकारणात अशा तोंडाची गरज आहे, माझा त्यांना सल्ला आहे की असेच ठेवा.राज ठाकरेराज ठाकरे कलावंत माणूस आहे. उत्तम व्यंगचित्रकार आहेत. नेतेसुद्धा आहेत. देशात आणि महाराष्ट्रात ही कला लोप पावत आहे. राज ठाकरे यांनी ब्रश घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फटकारे मारले पाहिजेत.उद्धव ठाकरेअनेक वर्षे जवळून पाहत आहेत. ते निष्कपट आहेत. आता मुख्यमंत्री या नात्याने काही कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी