शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

PDCC Bank Election: हद्द झाली! विरोधी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून संजय काळे यांचे 34 अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 22:21 IST

PDCC Bank Election Politics: जिल्ह्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील आर्थिक नाडी ताब्यात ठेवण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्वाची मानली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सहकार कायद्याचा गैरफायदा घेत जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संजय काळे यांनी विरोधी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून चक्क 34 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतरही काही विद्यमान संचालकांनी सात-आठ अर्ज दाखल केले आहेत. 

जिल्ह्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील आर्थिक नाडी ताब्यात ठेवण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्वाची मानली जाते. यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,  गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह बहुतेक सर्व आमदार आणि वर्षोनुवर्षे संचालक असलेल्या लोकांना बँकेचा मोह सुटत नाही. जिल्ह्यातील सहकारी संस्था ताब्यात ठेऊन हे संचालक बँकेवर आपले वर्चस्व ठेवतात. परंतु आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस वाढल्याने व भाजपच्या वतीने बहुतेक सर्व गटात उमेदवार उभे करून आव्हान उभे केले आहे.

यामुळेच विद्यमान संचालकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून,  विरोधी उमेदवाराला सूचकच मिळू नये म्हणून जास्तीत जास्त उमेदवार अर्ज दाखल करण्याचे राजकारण खेळले जात आहे. नवीन सहकार कायद्यानुसार एका उमेदवारांनी किती अर्ज दाखल करावे याला बंधन नाही, पण एकाच व्यक्तींने दोन उमेदवारांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली तर दोन्ही अर्ज बाद केले जातात. याच नियमाचा गैरफायदा घेत काळे यांनी चक्क 34 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी 55 अर्ज विकत घेतले होते.राज्यमंत्री भरणेंचे दोन गटात अर्ज गेल्या अनेक वर्षांपासून बँकेचे संचालक असलेल्या व सेफ ब गटातून(पणन) निवडून येणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी चक्क दोन गटातून ब गट व अनुसूचित जातीजमाती गटातून देखील उमेदवार अर्ज दाखल केला आहे. पणन गटातून भरणे यांच्या विरोधात भाजपने अर्ज दाखल गेल्याने खबरदारी म्हणून भरणे यांनी अन्य गटातून अर्ज दाखल केला आहे. परंतु यामुळे अनुसूचित जातीजमाती गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांची चलबिचल सुरू झाली आहे.

टॅग्स :Puneपुणे