शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचारात काकडेंचा 'क्रिम' राेल असेल : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 15:01 IST

निवडणूकीच्या प्रचारात संजय काकडेंचा 'क्रिम' राेल असेल अशी टिप्पणी गिरीश बापट यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केली आहे.

पुणे : भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे यांनी आपण काॅंग्रेसमध्ये जाणार असल्याचे जाहीर केलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्ती करण्यात यश आले. त्यामुळे काकडे हे भाजपामध्ये राहणार असून त्यांना पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे देखील असल्याने काकडे यांची येत्या निवडणूकीच्या प्रचारात काय राेल असेल असा प्रश्न केला असता काकडेंचा प्रचारात 'क्रिम' राेल असेल अशी टिप्पणी गिरीश बापट यांनी केली. 

काल रात्री उशीरा पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आज वाजत गाजत भाजप पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. बापट म्हणाले, येत्या निवडणूकीत प्रत्येकावर पक्षाने जबाबदारी निश्चित केली आहे. काकडे यांच्यावर देखील चांगली जबाबदारी दिली असून त्यांचा निवडणूकीत क्रिम राेल असेल. काेणाला काय जबाबदारी द्यायची हे पक्षसंघटन ठरवत असतं. त्याप्रमाणे कामाचे वाटप केले जाते. निवडून येण्याच्या दृष्टिकाेनातून हे उपयाेगी पडत असते. जाे सक्षम असेल त्याला ती जबाबदारी दिली जाते. आम्ही हातात हात घालून काम करणार आहाेत, पायात पाय अडकवणार नाही. 

तसेच ज्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही त्या सर्वांची भेट घेणार असून इतर पक्षांच्या उमेदवारांची देखील भेट घेणार असल्याचे बापट यावेळी म्हणाले. 

दरम्यान काकडे हे पुण्यातून लाेकसभेची जागा भाजपाकडून लढविण्यासाठी उत्सुक हाेते. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते पक्षांतर देखील करणार हाेते. परंतु मुख्यमंत्र्यांनी काकडेंशी चर्चा करुन त्यांची मनधरनी केली. त्यानंतर त्यांच्यावर निवडणूकीत पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापटSanjay Kakdeसंजय काकडेBJPभाजपा