रिक्षांबरोबरच सरकारी कार्यालयांचेही सॅनिटायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:24+5:302021-04-16T04:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आप रिक्षा संघटनेच्या वतीने आता रिक्षांबरोबरच सरकारी कार्यालयांचेही निर्जंतुकीकरण करून देण्यात येत आहे. संघटना स्वखर्चाने ...

रिक्षांबरोबरच सरकारी कार्यालयांचेही सॅनिटायझेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आप रिक्षा संघटनेच्या वतीने आता रिक्षांबरोबरच सरकारी कार्यालयांचेही निर्जंतुकीकरण करून देण्यात येत आहे. संघटना स्वखर्चाने हा उपक्रम राबवत आहे.
शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संघटनेच्या सदस्यांनी सॅनिटायझेशन केले. त्याशिवाय शहरातील पोलीस चौक्यांमध्येही सॅनिटायझेशन करून देण्यात येत आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सॅनिटायझेशन केले. संघटनेचे पदाधिकारी असगर बेग, गणेश ढमाले, केदार ढमाले, आनंद अंकुश, असिफ मोमीन, किरण कांबळे, उमेश बागडे, चाँद शेख व अन्य स्वयंस्फूर्तीने हे काम करत आहेत.
रिक्षाचालकांना लसीकरणासाठी केंद्र निवडून देणे, ॲप्लिकेशनवर नावनोंदणी करून देणे अशी मदतही करण्यात येत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून संघटना हे काम करत असल्याने सदस्यांनी सांगितले. त्यासाठी ५ रिक्षा तयार केल्या असून पंप, सॅनिटायजर विकत घेण्यात आले आहे. कोणाचा सदस्य आहे वगैरे भेद न करता सरसकट सर्व रिक्षाचालकांना तसेच सरकारी कार्यालये, पोलीस चौकी यांंना ही सेवा विनामूल्य देण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी दिली.