शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बारामती परिवहन महामंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 18:23 IST

बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली सॅनिटायझेशन व्हॅन तयार

ठळक मुद्देबारामती शहरातील कोरोनाच्या संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन सतर्क सॅनिटायझर व्हॅनवर एसटी महामंडळाचे कामगार चालक म्हणुन काम पाहणार

बारामती: बारामती शहरातील कोरोनाच्या संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक प्रक्रियेतपोलीसांसह शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठा आहे. या पार्श्वभुमीवर जीवधोक्यात घालुन काम करत असणाऱ्या शासनाच्या सर्व कर्मचायांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सॅनिटायझेशन बस सेवा देऊ केली आहे. बुधवारी(दि.१५)राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तयार केलेली  सॅनिटायझेशन व्हॅन बारामती आगाराने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्त केली. विभाग नियंत्रक यामिनी जोशी पुणे यांनी सांगितले,बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ती व्हॅन बारामती उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांना सोपवण्यात आली आहे. या सॅनिटायझर व्हॅनवर एसटी महामंडळाचे कामगार चालक म्हणुन काम पाहणार आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर व त्यांचा स्टाफ,पोलीस प्रशासन,नगर पालिका प्रशासन,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय व सरकारी कर्मचारी यांना त्याची सेवा बजावताना किंवा घरी जाताना खबरदारी म्हणुन सॅनिटायझेशन बसच्या आतमध्ये असणाऱ्या शॉवरमधून कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमुळे घरी कुटुंबासाठी कोरोना संसगार्चा धोका निर्माण होणार नाही. बसमध्ये ४०० लिटर पाण्यामध्ये सोडिअम हायड्रो क्लोराईड हे निर्जंंतुकीकरण करणारे औषध वापरले जाणार आहे.त्यासाठी डी.सी करंटवरकार्यान्वित होणारी  बारा व्होल्टची मोटार जोडण्यात आली आहे. व्हॅनमधुन जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर फवारणी होणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचे पूर्णपणे निर्जंंतुकीकरण होऊन तो आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो , असे बारामती आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले .यावेळी पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी,यंत्र अभियंता अशोक सोट पुणे,विभागीय वाहतूक अधिकारी दिपक घोडे,आगर प्रमुख अमोल गोंजारी,वाहतूक यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीpassengerप्रवासी