खराडी-विमाननगरमध्ये २४३ घरांचे सॅनिटायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:12 IST2021-04-28T04:12:31+5:302021-04-28T04:12:31+5:30

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ''सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'' कडून खराडी व विमाननगर या भागातील ६०हून ...

Sanitation of 243 houses in Kharadi-Vimannagar | खराडी-विमाननगरमध्ये २४३ घरांचे सॅनिटायझेशन

खराडी-विमाननगरमध्ये २४३ घरांचे सॅनिटायझेशन

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ''सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'' कडून खराडी व विमाननगर या भागातील ६०हून अधिक सोसायट्या आणि स्वतंत्र घरे मिळून एकूण २४३ घरांमध्ये मोफत सॅनिटायझेशन करण्यात आले, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.

जवळपास ६० सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तसेच काही घरांमध्ये कोरोनामुळे रुग्ण दगावले होते. दररोज सुमारे १५ पेक्षा अधिक तक्रारी फाऊंडेशनच्या टोल फ्री क्रमांकावर नोंदविल्या जात आहेत. त्यावर त्वरित कार्यवाही करत फाऊंडेशनकडून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने प्रसार होत असताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व सरकारी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यांना सहाय्यभूत ठरेल असे काम करण्यासाठी फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याने तक्रारींचे निवारण होत आहे, असे पठारे यांनी म्हणाले.

Web Title: Sanitation of 243 houses in Kharadi-Vimannagar