शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा ‘सोनहिरा’ कारखाना सर्वोत्कृष्ट : व्हीएसआय; पर्यावरण पुरस्कार जी. डी. बापू लाड कारखान्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 13:07 IST

वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने सांगलीच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येईल. कोल्हापूरच्या संभाजी मिसाळ, सुशीला पाटील आणि साताऱ्याच्या अण्णासाहेब शिंदे यांना ऊसभूषण पारितोषिक देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२६ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता मांजरी येथील व्हीएसआयच्या आवारात कार्यक्रममानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप

पुणे : वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराने सांगलीच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात येईल. कोल्हापूरच्या संभाजी मिसाळ, सुशीला पाटील आणि साताऱ्याच्या अण्णासाहेब शिंदे यांना ऊसभूषण पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी केली. व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ या वेळी उपस्थित होते. येत्या २६ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता मांजरी येथील व्हीएसआयच्या आवारात हा कार्यक्रम होईल. सोनहिरा साखर कारखान्याने सरासरी साखर उतारा १२.१६ टक्के इतका दिला असून, क्षमतेच्या १०६.५० टक्के इतका वापर केला आहे. साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादन खर्चदेखील ५१३ वरून ५०७ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. या कामगिरीबद्दल त्यांना मानाच्या वसंतदादा पाटील पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाच्या वर्षीपासून आबासाहेब उर्फ किसन महादेव वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरणसंवर्धन पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षीचा पहिला पुरस्कार सांगलीच्या क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास देण्यात येणार आहे. मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार कोल्हापूरच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखाना, ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू कारखान्यास मिळाला आहे़मध्य विभाग पुरस्कार : गणेश शितोळे-मुळशी, बापू प्रभाकर साबळे-शिरूर, वैयक्तिक पुरस्कार : श्रीशैल हेगण्णा-कोल्हापूर ऊस विकास अधिकारी, आर. बी. पाटील-इंजिनिअर सोलापूर, कृष्णा लोखंडे-केमिस्ट सातारा, अप्पासाहेब कोरे-अकौंटंट सांगली, सुधीर गेंगे-पाटील-आसवनी व्यवस्थापक इंदापूर, एम. डी. मल्लूर-कार्यकारी संचालक कर्नाटक. तांत्रिक पुरस्कार दक्षिण विभाग : जयवंत शुगर्स - सातारा, राजारामबापू पाटील - सांगली, विश्वासराव नाईक - सांगली, मध्य विभाग : व्यंकटेशकृपा शुगर - शिरूर, सोमेश्वर - बारामती, विघ्नहर - जुन्नर, उत्तरपूर्व विभाग : भाऊराव चव्हाण - नांदेड, कर्मयोगी अंकुशराव टोपे - जालना. 

टॅग्स :PuneपुणेSangliसांगली