जेजुरीच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी
By Admin | Updated: August 6, 2014 23:22 IST2014-08-06T23:22:45+5:302014-08-06T23:22:45+5:30
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी, तर उपनगराध्यक्षपदी गणोश आगलावे यांची आज एकमताने निवड झाली.

जेजुरीच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी
>जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संगीता जोशी, तर उपनगराध्यक्षपदी गणोश आगलावे यांची आज एकमताने निवड झाली. पालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ही दोन्ही पदे याच पक्षाकडे राहिली आहेत. हे दोन्ही पदाधिकारी प्रभाग क्र. 3 मधील असल्याने या प्रभागात मोठा जल्लोष करण्यात आला. पालिकेसमोर कार्यकत्र्यानी भंडा:याची उधळण करून नूतन पदाधिका:यांचे अभिनंदन केले.
उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग 3 मधील नगरसेवक गणोश आगलावे यांचे नाव सुचविण्यात आले. सर्वानुमते तेच नाव मान्य करून उपनगराध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. एकमेव अर्ज असल्याने आगलावे यांचीही निवड घोषित करण्यात आली.
या वेळी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप बारभाई, नगराध्यक्ष अविनाश भालेराव, उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई, नगरसेविका साधना दिडभाई, अमृता घोणो, सुरेखा सोनवणो, साधना दरेकर, ज्ञानेश्वरी बारभाई, सोनाली मोरे, नगरसेवक सुधीर गोडसे, लालासाहेब जगताप आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, एन. डी. जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुंभार, सुभाष खेडेकर, सदाशिव बारसुडे, रवी जोशी, राहुल घाडगे, माजी उपनगराध्यक्षा उषा आगलावे, सनी कुंभार आदींनी नवनिर्वाचित पदाधिका:यांचे अभिनंदन केले. जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्याकडे 7 महिलांसह 12 नगरसेवक आहेत. यामुळे साहजिकच दोन्ही पदे त्यांच्याकडेच राहणार होती. अपेक्षेप्रमाणो तसेच झाले. विरोधी काँग्रेसचे पाचही नगरसेवक या वेळी उपस्थित नव्हते.
4आज दुपारी 1 वाजता पालिका सभागृहात नायब तहसीलदार डी. एन. रेडके यांच्या पीठासीन अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनुसार या पदासाठी प्रभाग 3 मधील नगरसेविका संगीता सुनील जोशी यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिका:यांनी त्यांना विजयी घोषित केले. या निवडणुकीनंतर लगेचच उपनगराध्यक्षपदाचीही निवडणूक घेण्यात आली.