शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काम करण्यासाठी गडचिरोली मागून घेतले - संदीप पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 11:12 IST

गडचिरोलीमध्ये आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगून पाटील म्हणाले.

पुणे - पाच वर्षापूर्वी गडचिरोलीत असताना छोट्या कामांना सुरुवात केली होती. तेथे काम करण्यास अधिक वाव असल्याने आपण बढतीवर जाताना गडचिरोली परिक्षेत्र म्हणून मागून घेतली, असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. संदीप पाटील यांची आज पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रपदी पदोन्नतीने बदली झाली आहे.

याबाबत संदीप पाटील म्हणाले, पुणे ग्रामीण येथे २ वर्षापूर्वी आलो, तेव्हा कोरेगाव भीमा येथे आदल्या वर्षी दंगल झाली होती. त्यामुळे यंदा देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोक येणार, त्यातून काही अघटित घडणार अशी भीती व्यक्त केली जात होती. पोलिसांचे मनोबलही खालावले होते. २०१९ मध्ये ते सर्वात मोठे आव्हान होते. देशभरातील मीडियाचे त्याकडे लक्ष होते. मोठा बंदोबस्ताबरोबरच सर्वांना विश्वासात घेऊन १ जानेवारीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने देशभर चांगला संदेश गेला.

६६ गुन्हेगारी टोळ्यांवर मोकासह विविध प्रतिबंधक कायद्यांचा वापर करुन त्यांच्यावर नियंत्रण आणले. पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे उपमुख्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या. पुणेकरांनीही आपल्या प्रयत्नांना चांगली साथ दिली.

गडचिरोलीमध्ये आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगून पाटील म्हणाले, ५ वर्षांपूर्वी आपण छोट्या प्रमाणावर कामाला सुरुवात केली आहे. पुस्तक भेट योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाला. तेथे भरपूर काम करण्यास वाव आहे. त्यामुळे आपण गडचिरोलीला पसंती दिली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसGadchiroliगडचिरोली