संदीपने जीवनयात्रा संपवली आणि तो पास झाला...
By Admin | Updated: May 26, 2016 03:33 IST2016-05-26T03:33:31+5:302016-05-26T03:33:31+5:30
बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास

संदीपने जीवनयात्रा संपवली आणि तो पास झाला...
राजगुरुनगर : बारावी निकालाच्या धसक्याने निमगाव-खंडोबा (ता. खेड) येथील संदीप ज्ञानेश्वर शिंदे (वय २१) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणिताच्या पेपरात नापास होण्याच्या भीतीने त्याने हे पाऊल उचलले. मात्र, तो ५४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिंदे याने बारावीची परीक्षा दिली होती. आज निकाल होता, पण आपण नापास होऊ या भीतीने तो सकाळी सहा वाजताच घराबाहेर पडला. शेतात कामासाठी गेला असेल असे आई-वडिलांना वाटले. मात्र, त्याने शेतात जाऊन आत्महत्या केली. आपल्या शेतातील छपराच्या वाश्यास दोर लावून त्याने आपले जीवन संपविले. सकाळी आठच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर निमगाव येथेच त्याचा अंत्यविधी झाला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा अतिशय शांत स्वभावाचा मुलगा होता. त्याचे वडील निमगावला पोस्टमन आहेत. त्याला एक लहान बहीण असून तो आईवडिलांना एकटाच मुलगा होता. राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून त्याने बारावी सायन्सची परीक्षा यापूर्वी दोनदा दिली होती. मात्र, दोन्हीवेळा तो नापास झाल होता. त्याचा गणित हा विषय राहिला होता. तो पुन्हा सर्व विषय घेवून परीक्षल्ौा बसला होता. गणिताचा पेपर अवघड गेल्याने या वेळीही आपण नापास होऊ, या धास्तीने त्याने आज आपले जीवन संपविले.
संदीप सर्व विषय घेवून बारावीच्या परीक्षेला बसला होता. तो ५४ टक्के गूण मिळवून उत्तीर्ण झाला असल्याचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. पाटील यांनी लोकमशी बोलताना सांगितले.