सिमला ऑफीसच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीस सुरक्षारक्षकाला दिला करवतीचा धाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:34+5:302020-11-29T04:04:34+5:30
याप्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील सुरक्षारक्षक गणेश अडागळे (वय ५२, रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ...

सिमला ऑफीसच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीस सुरक्षारक्षकाला दिला करवतीचा धाक
याप्रकरणी भारतीय हवामान शास्त्र विभागातील सुरक्षारक्षक गणेश अडागळे (वय ५२, रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गणेश अडागळे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असताना २७ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास वेधशाळेच्या आवारात ४ चोरटे शिरले. त्यावेळी आवारात गस्त घालणारे सुरक्षारक्षक अडागळे यांनी चोरट्यांना पाहिले. चोरट्यांनी अडागळे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाºयाला करवतीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी करवतीच्या सहाय्याने चंदनाची दोन झाडे कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक महांगडे तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या महिनाभरात चोरट्यांनी फर्ग्युसन महाविद्याालयाचे आवार तसेच बंडगार्डन रस्त्यावरील टाटा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेली आहेत.