जिरेगाव तलावात वाळूउपसा; पाच जणांना अटक
By Admin | Updated: August 12, 2014 03:57 IST2014-08-12T03:57:23+5:302014-08-12T03:57:23+5:30
जिरेगाव (ता. दौंड) येथील तलावात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली

जिरेगाव तलावात वाळूउपसा; पाच जणांना अटक
कुरकुंभ : जिरेगाव (ता. दौंड) येथील तलावात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. या प्रकरणी पाटसचे मंडलाधिकारी राजेंद्र म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे.
गोविंदा गेजगे (वय २0), बाळू मोरे (वय २८), सचिन खरात (वय २९), धनाजी टेंगळे (वय ४0),
विजय दिवेकर (वय ३५, सर्व रा. वरवंड, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
जिरेगाव परिसरात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती जिरेगावच्या ग्रामस्थांना मिळाली. त्यानुसार ग्रामस्थांनी वरील वाळूचोरांना रंगेहाथ पकडून त्यांना कुरकुंभ पोलिसांच्या हवाली केले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडील १ जेसीबी, २ ट्रॅक्टर ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या ठिकाणी ३0 ब्रास वाळूउपसा केला असल्याचे समजते.