रेल्वे उड्डाणपुलाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

By Admin | Updated: August 8, 2014 23:20 IST2014-08-08T23:20:41+5:302014-08-08T23:20:41+5:30

रिंगरोडअंतर्गत रेल्वे मार्गावर बारामती शहरात उभारण्यात येणा:या उड्डाणपुलाच्या वाढीव 57 लाख 64 हजार 857 रुपयांच्या खर्चाला बारामती नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

Sanction for extension of railway flyover | रेल्वे उड्डाणपुलाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

रेल्वे उड्डाणपुलाच्या वाढीव खर्चाला मंजुरी

>बारामती : रिंगरोडअंतर्गत रेल्वे मार्गावर बारामती शहरात उभारण्यात येणा:या उड्डाणपुलाच्या वाढीव 57 लाख 64 हजार 857 रुपयांच्या खर्चाला बारामती नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 
आज मावळत्या नगराध्यक्षा जयश्री सातव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत 13 व्या वित्त आयोगातील शिल्लक 2 कोटी रुपयांचा निधी बहुमजली वाहनतळ आणि भाजीमंडई प्रकल्पासाठी नगरपालिकेचा हिस्सा म्हणून वापरण्यात यावा. याला मंजुरी देण्यात आली. वाहनतळ आणि भाजीमंडईचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 3 कोटी 58 लाख 69 हजार रुपये नगरपालिकेचा हिस्सा म्हणून भरण्यास राज्य शासनाने सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रेल्वे उड्डाणपुलाच्या वाढीव कामासाठी 57 लाख 64 हजार 857 रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये आरसीसी पाईलची लोड टेस्ट करणो, संरक्षक भिंत बांधून देणो, उड्डाणपुलाच्या आरसीसीच्या कामाला गंजरोधक मुलामा देणो, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या स्थलांतर करणो, पुलासाठी बीटमॅन पॅड बसविणो यासाठी हा खर्च अपेक्षित आहे. मूळ आराखडा करताना या बाबी विचारात का घेतल्या नाहीत, अशी विचारणा नगरसेवक सुभाष ढोले यांनी केली. त्यावर नगरपालिकेच्या सल्लागार अभियंत्यांनी उत्तर देताना सांगितले की, रेल्वेने या बाबी नंतर मंजूर केल्या आहेत. त्यानुसार बदल झाला. रेल्वे खात्याच्या आदेशानुसार या पुलाचे सर्व काम होणार आहे. यासह वैशिष्टय़पूर्ण योजनेतून शिल्लक राहिलेल्या निधीतून नवीन प्रकल्प मार्गी लावणो, क:हा नदीच्या पात्रत संरक्षक भिंत, स्मशानभूमीचे स्थरीकरण, मुस्लीम दफनभूमी विकसित करणो आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

Web Title: Sanction for extension of railway flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.