संक्रांत सणाची जय्यत तयारी
By Admin | Updated: January 15, 2016 04:05 IST2016-01-15T04:05:33+5:302016-01-15T04:05:33+5:30
जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी वाणखरेदीसाठी गुरूवारी बाजारपेठेत झुंबड उडाली होती. तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत संक्रातीला

संक्रांत सणाची जय्यत तयारी
पुणे : जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या संक्रांतीच्या सणासाठी वाणखरेदीसाठी गुरूवारी बाजारपेठेत झुंबड उडाली होती.
तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत संक्रातीला एकमेकांविषयी स्रेहभाव व्यक्त करण्याचा हा दिवस़ हा दिवस अधिक गोड करण्यासाठी व पारंपारिक पद्धतीने पुजन करण्यासाठी आज बाजारपेठेत सुगड तसेच ऊस, हळकुंड, कापूर, बोरं, हरबरा, ज्वारीच्या लोंब्या याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती़ भोगीची भाजी करीत अनेक महिलांची घरीच तीळाच्या वड्या करण्याची घाई सुरु होती़ त्याचवेळी तयार तीळगुळ, तीळाच्या वड्यांनाही बाजारात मोठी मागणी होती़ संक्रांतीला गुळपोळी हमखास केली जाते़ आता बाजारातही तयार गुळपोळ्या मिळत असून गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी आगाऊ मागणी नोंदविली जात होती़ संक्रातीपासून घरोघरी हळदीकुंकाचा कार्यक्रम केला जातो़