पुरावे मिळाल्यास सनातनवर बंदी घाला : रामदास आठवले
By Admin | Updated: September 25, 2015 00:50 IST2015-09-25T00:50:08+5:302015-09-25T00:50:08+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्ते प्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड हा सनातनचा कार्यकर्ता असल्याचे सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत.

पुरावे मिळाल्यास सनातनवर बंदी घाला : रामदास आठवले
पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्ते प्रकरणी अटक करण्यात आलेला समीर गायकवाड हा सनातनचा कार्यकर्ता असल्याचे सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. गायकवाडने पानसरेंचा खून वैयक्तिक पातळीवर केला की, सनातनच्या सांगण्यावरून याचा तपास पोलीस करीत आहेत. तपासात सनातन सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यास बंदी घालावी, असे मत रिपब्लिकन पार्र्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले. येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे कराराला आज ८३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आठवले यांनी येरवडा कारागृहाला भेट दिली. आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, आरपीआय मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)