शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या लीना मोतेवार यांना अखेर जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 19:23 IST

समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाने दिला दिलासा: विना परवानगी पुण्याबाहेर जाण्यास बंदी

पुणे : समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या संचालिका लीना महेश मोतेवार यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. विशेष न्यायालयाची परवानगी न घेता पुणे सोडून जायचे नाही, दर चार दिवसांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावायची आणि ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. जाधव यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे.        समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात सीआयडीने लीना मोतेवार (वय ३७, रा. विद्यादीप सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) यांना अटक केली होती. सर्वेसर्वा महेश मोतेवार, राजेंद्र भंडारी या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून ७ नोव्हेंबर २०१६ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.         समृद्ध जीवन फूड्स कंपनीच्या लीना मोतेवार या शेअर होल्डर होत्या. २०१३ मध्ये त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० शेअर्स होते. कंपनीच्या तीन प्रमुख शेअर होल्डरपैकी त्या एक असल्याने कंपनीचे व्यवहार व निर्णय याबाबत आरोपीची मुख्य भूमिका असल्याची शक्यता आहे. कंपनीच्या वाहनचालकाच्या घरी ठेवलेले १ कोटी रुपयांचे दागिने मोतेवार यांचे आहे. महेश मोतेवार अटकेत असताना लीना यांनी कंपनीशी निगडीत असलेल्या विविध मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच त्यांनी पुण्यातील सराफाकडून एक कोटी ६२ लाख रुपयांचे सोने, चांदी, हि-यांच्या दागिन्यांची खरेदी केली असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषणने केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणात महेश मोतेवार यांचा मुलगा अभिषेक मोतेवार आणि भाचा प्रसाद किशोर पारसवार देखील न्यायालयीन कोठडीत आहे. बचाव पक्षाकडून अ‍ॅड. सत्यम निंबाळकर यांनी कामकाज पाहिले. फसवणूक प्रकरणी दाखल असलेल्या खटल्यात मोतेवार यांची संपत्ती गोठवण्यात आली असून ते जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य आरोपी तुरुंगात आहे. लिना मोतेवार या केवळ एका वर्षासाठी संचालक होता. मात्र त्यांचा दैनंदिन कामकाजत सहभाग नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. निंबाळकर यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिस