शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 10:35 IST

मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39वा वाढदिवस साजरा केला होता.

ठळक मुद्देपुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. अंगावर  भरमसाट सोनं घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा अंगावर सोनं घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचीही पुण्यात चर्चा आहे.

पिंपरी चिंचवड : पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. अंगावर भरमसाट सोनं घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा अंगावर सोनं घालण्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचीही पुण्यात चर्चा आहे. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39वा वाढदिवस साजरा केला होता.सम्राट मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याची पोलिसांच्या सायबर सेलला तक्रार दिली होती. मोझे यांचं बालपण चिंचवड गावात गेलं होतं, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. चुलते आणि माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडेआठ किलो सोनं घालून मुलाखत दिली होती. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रमांक 13मधून निवडणूक लढवणार होते. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्याला पुणे महापालिका निवडणुकीचं तिकीट देणारच, असा विश्वास सम्राट मोझे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: लॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ