शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Monkey Pox: राज्यातून मंकी पॉक्सच्या दहा संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीला

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: July 28, 2022 20:35 IST

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला तरी ती महामारी असल्याचे जाहीर

पुणे: गेल्या महिनाभरात सर्वेक्षण करताना राज्यात मंकी पॉक्स सदृश लक्षणे आढळून आलेल्या 10 संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आठ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, दोन नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. दरम्यान नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरू नये यासाठी हे नमुने कोणत्या जिल्ह्यातील आहेत ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही. 

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला तरी ती महामारी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये देशात मंकी पॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. परंतु सध्या मंकी पॉक्स आजाराची लक्षणे आढळून येणा-या रुग्णांचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. 

महिनाभरात दहा संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे तातडीने पाठवून संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी आठ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित नामुन्यांचा अहवाल लवकरच येणार आहे. 

घाबरू नका काळजी घ्या

- मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी 2 ते 4 आठवड्यात बरा होतो.-  आरोग्य खात्याकडून खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.-   आपल्या भागात मंकी पॉक्ससदृश लक्षणे आढळल्यास त्वरित विलगीकरण करुन नजीकच्या आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. 

आरोग्य सर्वेक्षण करताना गेल्या महिनाभरात आढळून आलेले संशयित 10 रुग्णांचे नमुने  एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दहापैकी तीन जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तसेच देशांतर्गत प्रवास केला आहे. - डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक