वाघोलीच्या उपसरपंचपदी समीर भाडळे बिनविरोध
By Admin | Updated: March 24, 2017 03:58 IST2017-03-24T03:58:09+5:302017-03-24T03:58:09+5:30
वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समीर दत्तात्रय भाडळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी झालेल्या

वाघोलीच्या उपसरपंचपदी समीर भाडळे बिनविरोध
वाघोली : वाघोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी समीर दत्तात्रय भाडळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये समीर भाडळे यांचा एकमेव अर्ज आल्याने २१वे उपसरपंच म्हणून ते विराजमान झाले आहेत.
वाघोलीचे उपसरपंच कैलास सातव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सरपंच संजीवनी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. समीर भाडळे आणि मच्छिंद्र सातव यांच्यामध्ये निवडणूक होईल अशी शक्यता होती. मात्र सातव यांनी ऐनवेळी निवडणुकीला अनुपस्थिती दाखवत अर्ज दाखल केलाच नाही. या वेळी जयश्री भाडळे, सुनीता जाधवराव, कविता दळवी, मच्छिंद्र सातव, संजय सातव, ज्ञानेश्वर कटके वगळता सर्व सदस्य हजर होते. एकमेव अर्ज आल्याने भाडळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर जल्लोष साजरा केला. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मधुकर दाते यांनी काम पाहिले. भाडळे हे चालू पंचवार्षिक निवडणुकीतील चौथे उपसरपंच आहेत.(वार्ताहर)