शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 19:37 IST

अशोक म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये जरांगे-पाटील यांच्या शरीरयष्टीचे मोजमाप घेऊन पाच फूट सात इंच उंचीची प्रतिकृती तयार केली आहे....

- विशाल विकारी

लोणावळा (पुणे) : कार्ला गावातील वॅक्स म्युझियममध्ये मराठा तरुणाने मनोज जरांगे-पाटील यांचा मेणाचा पुतळा साकारला आहे. हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली आहे. अशोक म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये जरांगे-पाटील यांच्या शरीरयष्टीचे मोजमाप घेऊन पाच फूट सात इंच उंचीची प्रतिकृती तयार केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पायी निघालेले मनोज जरांगे-पाटील बुधवारी (दि. २४) कार्ला फाटा येथून पुढे जाणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी येथील वॅक्स म्युझियममध्ये त्यांचा मेणाचा पुतळा तयार झाला आहे. जरांगे-पाटील तेथे भेट देऊन स्वत:चा मेणाचा पुतळा पाहणार का, याबाबत सध्यातरी काही स्पष्टता नसली तरी उत्कंठा निर्माण झाली आहे.

याविषयी अशोक म्हाळसकर व त्यांचा मुलगा ऋषी म्हाळसकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता मोठी लढाई लढत आहेत. अशा संघर्ष योद्ध्याचे स्मरण कायम रहावे, याकरिता हा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. ही सकल मराठा समाजासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. हा पुतळा साकारण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. तीन महिन्यांमध्ये जरांगे-पाटील यांच्या शरीरयष्टीचे मोजमाप घेऊन पाच फूट सात इंच उंचीची प्रतिकृती तयार केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील