कासेवाडीत एकाच दिवशी २ सराईत गुन्हेगार, १ तडीपार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST2021-06-21T04:09:37+5:302021-06-21T04:09:37+5:30

पुणे : भवानी पेठेतील कासेवाडीमध्ये एकाच दिवशी २ सराईत गुन्हेगार आणि एक तडीपार अशा ३ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ...

On the same day in Kasewadi, 2 criminals were arrested and 1 was arrested | कासेवाडीत एकाच दिवशी २ सराईत गुन्हेगार, १ तडीपार जेरबंद

कासेवाडीत एकाच दिवशी २ सराईत गुन्हेगार, १ तडीपार जेरबंद

पुणे : भवानी पेठेतील कासेवाडीमध्ये एकाच दिवशी २ सराईत गुन्हेगार आणि एक तडीपार अशा ३ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने हत्यारासह जेरबंद केले.

गुन्हे शाखेचे पथक पेट्रालिंग करत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना माहिती मिळाली की, तडीपार गुंड सूरज ऊर्फ पाप्या जाधव (वय २२, रा. कासेवाडी) हा कासेवाडी येथील पतसंस्थेजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलीस हवालदार अजय थोरात यांना सध्या पॅरोलवर बाहेर आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार कोयता घेऊन तरुण मंडळाजवळ उभा आहे. त्यावरुन पोलिसांनी रवी मनोज कोळी (वय २२, रा. कासेवाडी) याला कोयत्यासह पकडले.

गुप्ती घेऊन १० नंबर कॉलनीजवळील पार्किंगमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार आझिम शेख उभा असल्याची माहिती पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांना मिळाली. त्यानुसार आझिम सलीम शेख (वय २३, रा. कासेवाडी) याला गुप्तीसह पकडण्यात आले. या गुन्हेगारांवर जबरी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनचोरी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांना पुढील तपासासाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, अय्याज दडडीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, विजेसिंग वसावे, सचिन जाधव, दत्ता सोनावणे, शशिकांत दरेकर यांनी केली आहे.

Web Title: On the same day in Kasewadi, 2 criminals were arrested and 1 was arrested