वढू बुद्रुकला रंगला संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा

By Admin | Updated: January 18, 2016 01:12 IST2016-01-18T01:12:22+5:302016-01-18T01:12:22+5:30

श्री छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे जय शिवराय संघटना, छावा ग्रुप, वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती

Sambhaji Raje's coronation ceremony will be held in Budruk | वढू बुद्रुकला रंगला संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा

वढू बुद्रुकला रंगला संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा

कोरेगाव भीमा : श्री छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे जय शिवराय संघटना, छावा ग्रुप, वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या विद्यमाने छत्रपती संभाजीमहाराजांचा ३३५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संभाजीराजांच्या ३३५व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथे संभाजीराजांच्या मूर्तीला अभिषेक करून मिरवणूक काढून पालखी नगर रस्त्याने वढू बुद्रुक येथे आणण्यात आली. त्यानंतर वढू येथे समाधिपूजन, तसेच राज्याभिषेक सोहळाही पार पडला.
या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, संत तुकाराममहाराजांचे वंशज व संत तुकाराममहाराज संस्थानचे विश्वस्त हभप शांताराममहाराज
मोरे, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य सुरेश मुळावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, बाळासाहेब खैरे, श्रीकांत ढमढेरे, बाळासाहेब
चव्हाण, प्रफुल्ल शिवले,
अंकुश शिवले, संतोष शिवले, उत्तमराव भोंडवे पाटील, चंद्रकांत वारघडे, अंकुश घार आदी
सहभागी झाले होते.
या वेळी पाचर्णे म्हणाले , श्रीक्षेत्र वढू बुद्रुकची आदर्श ग्राम
योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच बढूला ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा
निधी तत्काळ मिळविण्यासाठी
प्रयत्न करणार आहोत. शंभू
छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा लवकरच राज्यभर साजरा होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला. मोरेमहाराज यांनीही
या कार्यक्रमाची व्याप्ती दरवर्षी
वाढत असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर मार्गदर्शन करून सूत्रसंचालन केले. जय शिवराय संघटनेचे संस्थापक
अध्यक्ष अमित सातव व
मच्छिंद्र गायकवाड यांनी स्वागत
केले. गणेश जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Sambhaji Raje's coronation ceremony will be held in Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.