शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई; बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यानं 'शहबाज' सरकार बिथरलं
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
5
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
6
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
7
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
8
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
9
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
10
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
11
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
12
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
13
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
15
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
16
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
17
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

Pandharpur Wari: पालखीमार्गात संघटनांचे लोक नकोत : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांचे पोलिसांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:13 IST

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांनी करण्यात आली आहे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. अशा स्थितीत काही संघटनांचे लोक पालखी सोहळ्यात घुसून हा क्रम बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी प्रशासनाने त्यांना पालखी सोहळ्यात घुसखोरी करू देऊ नये अशी विनंती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्यावतीने पुणे पोलिसांनी करण्यात आली आहे. मात्र त्यांनी थेट  संभाजी भिडे गुरुजी किंवा शिवप्रतिष्ठानचा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता पालखी प्रमुखांच्या विनंतीला पुणे पोलीस कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही वर्षांपासून संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे धारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी शहरातील शिवाजीनगर भागात शंभरपेक्षा अधिक धारकरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. मात्र स्वतः गुरुजी यांनी पालखीचे दर्शन घेतले होते. त्यावेळीही परंपरा मोडल्याचे मत व्यक्त करत पालखी प्रमुख आणि काही वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

  यंदा तर पालखीव प्रमुखांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून मागील दिलेले पालखी परंपरा न मोडण्याचे आश्वासन पाळण्याची आठवण केली आहे. परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज त्यानंतर श्री संत जगनाडे महाराज त्यानंतर श्री संत गव्हरशेठ वाणी आणि शेवटी श्री संत ज्ञानेश्वर महाराज असा पालख्यांचा क्रम आहे . त्यात काही संघटनांचे लोक घुसतात आणि संतांच्या पालख्यांचा क्रम बिघडतो असे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. आता या पत्राला पुणे पोलीस काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे. 

दरम्यान मागील वर्षीप्रमाणे यंदाही पालखी मार्गात संभाजी भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठानचे धारकरी सहभागी होणार असल्याचे समजते. दुपारी ते जंगली महाराज मंदिरात एकत्र जमणार असल्याचे समजते.

टॅग्स :sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी