साळवाडी बोरी खु. येथे शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:26+5:302021-09-06T04:13:26+5:30

येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला व प्राथमिक शाळा,बोरी खुर्द ठिकाणी कार्यक्रम झाला. या वेळी या कोविडकाळात शिक्षकांची ...

Salwadi Bori Khu. Honor the teachers here | साळवाडी बोरी खु. येथे शिक्षकांचा सन्मान

साळवाडी बोरी खु. येथे शिक्षकांचा सन्मान

येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला व प्राथमिक शाळा,बोरी खुर्द ठिकाणी कार्यक्रम झाला. या वेळी या कोविडकाळात शिक्षकांची भूमिका खूप जास्त महत्त्वाची होती. सर्व शाळा बंद असतानासुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे महत्त्वाचे काम केले, यांची कृतज्ञता म्हणून लायन्स क्लब जुन्नर शिवनेरी कडून सर्व शिक्षकांना फेटा व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी रमेश बहिरट , मुख्याध्यापक नानाभाऊ शेळकंदे, महेंद्र गणपुले , समशुद्दीन पटेल ,अशोक हांडे , विकास मटाले ,संदीप शिंदे , वैशाली नायकोडी ,रुपाली कोरडे , विजय चव्हाण ,संजय धायबर यांचा सन्मान करण्यात आला .

शिक्षक दिनाचे आयोजन अध्यक्ष संपत शिंदे, सचिव नरेंद्र गोसावी,खजिनदार विवेक मुळे,प्रोजेक्ट इन्चार्ज विश्वास भालेकर,सचिन भोर, अजय चोरडिया, नवीन पटेल यांनी केले होते.

लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Salwadi Bori Khu. Honor the teachers here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.