शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जीवाची बाजी लावून 'देवदूतां'नी केली पुरात अडकलेल्या २ महिन्यांच्या बाळासह २० जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 13:16 IST

कऱ्हा- निरा नदीच्या पुराने चोहोबाजूने घराला दिला होता वेढा 

ठळक मुद्देरेस्क्यु टीम ने राबवली बचाव मोहीम 

बारामती: पुणे शहरासह जिल्ह्यातील इंदापूर, बारामती भागात बुधवारी परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे नद्या, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले. यात काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. यात पुराचा धोका ओळखून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पण बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोलनकर वस्तीला चोहोबाजूने कऱ्हा व नीरा नदीच्या महापुराचा वेढा बसला.

बारामती तालुक्याच्या पूर्व पट्यातील मेखळी परिसरात  (ता.१४) रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे.सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या शोभा विशाल सोलनकर या आई व त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह २० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.

सोनगाव येथे कऱ्हा आणि नीरा दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने याठिकाणच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.त्यामुळे गावातील ५० हून अधिक घरे पाण्यात होती. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. अशावेळी माजी सरपंच विकास माने यांनी आमदार रोहित पवार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली .त्यावर आमदार पवार यांनी तातडीने सूत्रे हलवली. अवघ्या अर्ध्या तासात पोलिस यंत्रणा पोहचली.त्यानंतर रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले .त्यानंतर  तात्काळ मदत मिळाल्याने बाळासह इतरांसमोर येणारा गंभीर प्रसंग टळला.

 

टॅग्स :BaramatiबारामतीRainपाऊसfloodपूरRohit Pawarरोहित पवार