शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

'कडक सॅल्यूट'! अपंग असूनही संचारबंदीच्या काळात पुणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून 'ड्युटी' बजावणारा 'राजा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 23:53 IST

राजा’ नाकाबंदीतील विशेष पोलीस अधिकार्‍यांची सर्वांना भुरळ

पुणे : ग्रामीण भागातल्या रानवस्त्यांपासून ते पोलीस दलाच्या शोध पथकापर्यंत अशा सर्वच ठिकाणी श्वान हा प्राणी प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. कथा, कादंबरी,सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांसह आजूबाजूला घडणाऱ्या अनेक संकटकालीन प्रसंगांमध्ये श्वानांच्या इमानदारीवर शिक्कामोर्तब होते. तसेच पोलिसांना देखील मोठमोठ्या गुन्ह्यांचा उलगडा लावण्यात श्वानाने महत्वाची भूमिका बजावलेली आपण पाहिलेली आहे. पण एका पायाने अपंग असून देखील कोरोना संचारबंदीच्या काळात असाच एक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र 'ड्युटी' करणाऱ्या ''राजा' गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. 

पुणे शहरातील कोरोना लॉकडाऊन काळात पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु आहे. बंदोबस्तासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. त्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील नाकाबंदीत एक विशेष पोलीस अधिकारीही पोलिसांच्या बरोबर बंदोबस्तात सहभागी झाला आहे. त्याचे नाव ‘राजा’ आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांबरोबर कायम दक्ष असलेल्या या तीन पायावा श्वान नाकाबंदीदरम्यान हजर असल्याचे ट्वीट केले होते. त्याचे अनेकांनी कौतुक केले. अभिनेता जॉन अब्राहिम याने रिट्वीट करीत ट्रायपॉड राजाचे कौतुक केले आहे. 

बालगंधर्व रंगमंदिर चौकात लावलेल्या नाकाबंदीत पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांसोबत राजाही दक्ष असतो. हा राजा नेमका कसा व कोठून आला, याची कोणाला माहिती नाही़. पोलीस बंदोबस्तावर उभे राहिल्यावर राजाही तेथे येऊन उभा रहात असे. हळु हळू पोलिसांना त्याचा लळा लागला. ते आपल्या डब्यातील पोळी तसेच बिस्किट त्याला खायला देऊ लागले. तो या पोलिसांबरोबर सायंकाळी आणि रात्री दक्ष राहू लागला. येणार्‍या जाणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवू लागला. 

डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, नाकाबंदीत हा आमच्याबरोबरचा खास दोस्त बनला आहे. तो विशेष पोलीस अधिकार्‍यांपेक्षा कोठेही कमी नाही.पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या ट्विटनंतर अनेक जण खास राजाला पाहायला बालगंधर्व रंगमंदिर येथे येऊन त्याचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड