शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! जिद्द अन् कष्टाने झुकवलं नियतीलाही ; पुण्यातील अंध जोडप्याची अशी 'स्वाभिमानी' कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 17:18 IST

नियतीने पदरी टाकलेल्या अंधत्वाची ढाल करून लाचारी पत्करण्याऐवजी त्यांनी कष्ट करून स्वाभिमानाने जगण्याचं ठरवलं..!

- शिवानी खोरगडेपुणे - धष्टपुष्ट असूनही बरेचजण भीक मागताना दिसतात. पण पुण्यातील एक दृष्टिहीन जोडप्यानं ही लाचारी स्वीकारली नाही. बाजीराव रस्त्यानं जाताना शनिपार सिग्नलच्या १५-२० पाऊलं आधी डाव्या हाताला पदपथावर हे स्वाभिमानी जोडपं फुटपाथवर बसलेलं दिसतं. दोघांनाही दृष्टी नाहीये. रस्त्याच्या विरुद्ध दिशेला काही धष्टपुष्ट लोक मात्र भीक मागताना दिसतात. पण हे जोडपं कधीच येणाऱ्या जाणाऱ्यांकडे हाथ पसरत नाहीत. ते वजनकाटा घेऊन बसतात. आणि आपला उदरनिर्वाह करतात. पण उन्हाचं असं फुटपाथवर बसणं कितीही कष्टदायक होत असलं तरी त्यांनी स्वाभिमानानं जगता यावं म्हणून ही मेहनत स्वीकारली आहे. 

विशाल कांबळे आणि काजल कांबळे असं त्यांचं नाव. पुण्यातील हडपसर परिसरात ते राहतात. त्यांना एक संग्राम हा मुलगा पहिलीत आणि एक मुलगी सहावीत आहे. विशाल यांचं शिक्षण अर्धवट राहीलं. तरी त्यांच्या बोलण्यातून ते शिक्षित असल्याचं जाणवतं. दृष्टी नसली म्हणून काय झालं, मेहनत ही केलीच पाहिजे, असं या जोडप्याचं म्हणणं आहे. ते रस्त्यावर बसतात म्हणून कधी कधी लोक त्यांना भिकारी समजून शिळं अन्न देऊन जातात. पण जे लोक धष्टपुष्ट आहेत तरी भीक मागतात त्यांच्याकडे बघून लोकांना गैरसमज होतो आणि म्हणून आम्हालाही तशीच वागणूक मिळते, असा खेद विशाल यांनी व्यक्त केला. 

काजल कांबळे सांगतात, ''माझ्या मुलाला पोलिस किंवा आर्मीत जायचंय. पण तो आम्हाला एकुलता एक असल्यानं मी त्याला नाही म्हणते. सध्या तोच आमचा आधार आहे. माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचंय. आमच्यासारख्या दृष्टिहीन लोकांसाठी कमी दरात  तिला योग्य उपचार मिळवून द्यायचे आहेत असं माझ्या मुलीचं स्वप्न आहे.'' 

https://www.facebook.com/LokmatPune/videos/291705852304494/

विशाल हे पूर्वी आलेपाकचा व्यवसाय करायचे. नंतर ते वजनकाटा घेऊन बसू लागले. हडपसरला ते एका खोलीत राहतात. ज्याचं भाडं साडेतीन हजार रुपये आहे. मोठ्या मुश्कीलीने महिन्याकाठी सहा हजार रुपयांपर्यंत ते वजनकाट्यातून कमावतात. त्यात घरभाडं, महिन्याचा किराणा, हडपसर ते शनिपार प्रवासाचा खर्च यातच सगळे पैसे संपतात. हाती एक पैसाही शिल्लक राहत नाही. दोन्ही मुलांना शिक्षणासाठी हॉस्टेलवर त्यांनी ठेवलंय. पण सध्या शाळाच बंद असल्यानं लहान मुलगा हा सतत आई-बाबांना बिलगूनच असतो. कांबळे कुटुंबाने ज्याप्रकारे स्वाभिमान जपलाय तो खरंच वंदनीय आहे.---------------------------------

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांग