महामानवाला मानवंदना
By Admin | Updated: April 15, 2017 03:50 IST2017-04-15T03:50:37+5:302017-04-15T03:50:37+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२६वा जयंती महोत्सव शहर आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सामाजिक, राजकीय संघटनांनी

महामानवाला मानवंदना
बारामती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२६वा जयंती महोत्सव शहर आणि परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सामाजिक, राजकीय संघटनांनी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. शहरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून आंबेडकरी जनसागर उसळला होता.
गुरुवारी शहरात विविध ठिकाणी सकाळी सामुदायिक बुद्धवंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुद्धवंदनेचा मुख्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आयोजित केला होता. शुक्रवारी (दि. १४) सकाळी नऊ वाजता नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष जय पाटील, हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी नगसेवक अॅड. सुभाष ढोले, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, नीता चव्हाण, अनिता जगताप, मयूरी शिंदे, विष्णुपंत चव्हाण आदी उपस्थित होते. बारामती विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक सुनील सस्ते, प्रशांत सातव यांनी अभिवादन केले. शहरात मेहतर वाल्मीक समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी समाजाचे अध्यक्ष अॅड. धीरज लालबिगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी आतिष लालबिगे, किरस्पाल वाल्मीकी, संजय मुलताणी, कृणाल लालबिगे, आकाश वाडिले तसेच महिला उपस्थित होत्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर ग्रुप, वीर लहुजी ग्रुपच्या नंदू खरात, विजय खरात, विक्रम लांडगे, संजय खरात, नितीन अवघडे, चेतन कांबळे, उमेश नेटके, करण खलाटे, अमर अडागळे, आदेश कुचेकर, सुजित रणदिवे, संजय भोसले, सोमनाथ पाटोळे, केदार पाटोळे यांनी अण्णा भाऊ साठे चौकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच, आंबेडकर रोड सोनवणे चौक येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम पाडला. या वेळी नगरसेवक गणेश सोनवणे, अभिजित सोनवणे उपस्थित होते. कसबा पंचशीलनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ एप्रिलपासून वृक्षारोपण, स्नेहभोजन आदी उपक्रम राबविण्यात आले. भीमरत्ननगर, लक्ष्मीनगर, अण्णा भाऊ साठेनगर येथे सुजित रंधवे यांच्या नेतृत्वाखाली जय लहुजी फें्र ड सर्कल, एसआर ग्रुप, अण्णा भाऊ साठे तरुण मंडळ, लक्ष्मीनारायणनगर मित्र मंडळाच्या वतीने पूजापाठ विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पंचशीलनगर येथे नगरसेवक सचिन सातव, नगरसेवक सुनील सस्ते यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचा सामुदायिक बुद्धवंदना कार्यक्रम पार पडला. या वेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.(प्रतिनिधी)
त्रिरत्न प्रतिष्ठानतर्फे स्नेहभोजनाचा उपक्रम
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील त्रिरत्न मागासवर्गीय विकास प्रतिष्ठान, त्रिरत्न पतसंस्था, बौद्ध युवक संघटना, सटवाजीनगरच्या वतीने स्नेहभोजनाचा उपक्रम राबवला.
माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला. सामाजिक, राजकीय, अधिकारी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वच स्तरातील नागरिकांनी या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
या वेळी सुधीर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. आंबेडकरी विचाराचा प्रचार, प्रसार करावा, यासाठी हा उपक्रम मागील २६ वर्षांपासून राबवित आहे त्याला बारामतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो.