सलून दुकानदाराचा खून

By Admin | Updated: October 6, 2016 03:27 IST2016-10-06T03:27:16+5:302016-10-06T03:27:16+5:30

पूर्ववैमनस्यातून भेकराईनगर येथे एका सलून दुकानदाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. याबाबत हडपसर पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या ३ तासांत अटक

Salon shopkeeper's murder | सलून दुकानदाराचा खून

सलून दुकानदाराचा खून

फुरसुंगी : पूर्ववैमनस्यातून भेकराईनगर येथे एका सलून दुकानदाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. याबाबत हडपसर पोलिसांनी एका आरोपीला अवघ्या ३ तासांत अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार फरार झाले असून, हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास भेकराईनगर येथे भेकराई माता विद्यालयासमोर घडली.
दिनेश कमलेशप्रसाद शर्मा (वय २८, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, मूळ अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. आरोपी मंगेश किशोर शिंगाडे (वय २०) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार शुभम रमेश कवडे (वय १९) व एक अल्पवयीन मुलगा (दोघे रा. फुरसुंगी) फरार आहेत. याबाबत दिनेश शर्मा यांचा साथीदार राशीद तस्लीम शेख (वय २८, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शर्मा यांचे भेकराईनगर येथील भेकराईमाता विद्यालयासमोर सलून आहे. मृत शर्मा व आरोपी मंगेश शिंगाडे यांचे पूर्वी भांडण झाले होते.
शर्मा यांना तत्काळ मगरपट्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. हडपसर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपी मंगेश शिंगाडे याला अटक केली असून, इतर दोघांचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Salon shopkeeper's murder