सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत
By Admin | Updated: November 17, 2016 02:33 IST2016-11-17T02:33:24+5:302016-11-17T02:33:24+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळत नसल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत आले आहे.

सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून ५०० व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळत नसल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार अडचणीत आले आहे. तर, कापड दुकानदारांनी गेल्या आठ दिवसांपासून बोहनी झाली नाही. पतसंस्था व सहकारी बँकांना ५०० व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांची वाट पहात बसावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या समोर दिवसदिवस सुट्या पैशासाठी ताटकळत उपाशीपोटी रांगेत उभे राहावे लागत असल्याने बँकेच्या वतीने ग्राहकांना चहा, नाष्टा व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी खातेदार करत आहे.
तर, दुसरीकडे पतसंस्था व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी खातेदाराची वाट पहात असतात.बँक आॅफ बडोदा या बँकेत एका ग्राहकाला दररोज ५०० व हजार रुपयांच्या ४५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळतात. तर, हजार रुपये ५०० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी बँकेने तीन काउंटर चालू केले आहेत बँकेत २ हजार व १०० रुपयांच्या नोटा भरपूर असून ग्राहकांनी घाई गडबड करू नये, असे आवाहन बँक आॅफ बडोदाचे मॅनेजर अतुल सावंत यांनी केले.
त्याचप्रमाणे सुटे पैसे बाजारात न आल्याने सलून व्यवसाय, किराणा दुकानदार यांना उधारीवर धंदा करावा लागत आहे, तर आठ दिवसांत कापड दुकानदारांची बोहणीसुद्धा झाली नसल्याचे पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)
गर्दी : सात गावांकरिता एक शाखा
च्अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, लोणी आदी गावांतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा आहेत. गावागावात प्रत्येकी २ ते ३ पतसंस्था आहेत. सात गावांकरिता अवसरी खुर्द येथे राष्ट्रीयीकृत बँक आॅफ बडोदा ही शाखा आहे.
च्दोन दिवसांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्याने वरील सर्व गावांतील ४० ते ४५ खातेदारांनी बँॅक आॅफ बडोदात ५०० व १ हजार रुपंयाच्या नोटा भरण्यासाठी, बदलण्यासाठी मोठी गर्दी केली आहे