शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गावात सलमान शुटींगला आला अन एकच गर्दी उसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 7:17 PM

बारामती येथील होळ येथे दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून सलमानला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली हाेती.

बारामती- वडगाव निंबाळकर : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान याला पाहण्यासाठी होळ (ता.फलटण) गावामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. सलमान  'दबंग ३' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी या गावात आला होता सलमान खान गावात चित्रपटातील विविध प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी आला होता.चित्रपटातील प्रसंग प्रत्यक्षात आपल्या गावात ‘शुटींग’ केल्याचा गावकऱ्यांना हा पहिलाच अनुभव आहे.त्याचा आनंद लुटण्यासाठी आसपाच्या परीसरातुन ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.शिवाय सलमान खान ला जवळुन पाहण्यासाठी देखील ग्रामस्थांच्या उड्या पडल्याचे चित्र होते. यावेळी डान्सिंग स्टार प्रभुदेवा देखील ग्रामस्थांचे आकर्षण होता. 'दबंग ३'  या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच होळ निरा नदीच्या पात्रात पार पडले. यावेळी सलमान सह चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभुदेवा व इतर कलाकार त्यांच्या टीमसह आले होते. चित्रीकरण पाहण्यासाठी  त्या ठिकाणी नागरिक आणि चाहते मोठ्या प्रमाणावर आले होते. सुरक्षा रक्षक, पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तरीही चाहत्यांचा उत्साह कणभर ही कमी झाला नाही. मात्र गर्दी सांभाळताना पोलिसांची दमछाक झाली. सोशल मिडीयावर सलमान खान गावात आल्याची बातमी पसरली. त्यानंतर आणखीच चाहत्यांची गर्दी वाढतच गेली. विशेष म्हणजे गर्दी मध्ये लहान मुले आणि तरुणांचा मोठा सहभाग होता. आपल्या आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: घरांच्या छतावर, इमारतींवर चढले होते. नागरिक शिट्या वाजवून जोर जोरात ओरडत सलमान खानला आवाज देत होते.बारामती तालुक्यातील ढाकाळे येथील युवक राहुल जगताप याच्या ओपन जीप चा (एमएच ४२ अ‍े १९१९) देखील चित्रीकरणात वापर करण्यात आला आहे.

जानेवारी २०१९ पासुन या चित्रपटाचे लोकेशनचा शोध समन्वयक ‘मॉन्टी’ यांच्या माध्यमातुन सुरु होता. त्यांच्या ओळखीमुळे जगताप यांनी त्यांना परीसरातील लोके शन सुचविले होते.त्यानुसार परीसरात शुटींग सुरु असल्याचे जगताप यांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी(दि १६) देखील बारामती तालुक्यातील पणदरे परीसरात  चित्रपटातील सलमानवरील काही प्रसंगाचे चित्रीकरण पार पडले.फलटण परीसरात आणखी काही दिवस चित्रपटाचे चित्रीकरण सुरु राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या चित्रपटामध्ये सलमान खानसह अरबाज खान,सोनाक्षी सिन्हा,महेश मांजरेकर आणि त्यांच्या मुलीच्या भुमिका आहेत.

टॅग्स :Salman Khanसलमान खानShootingगोळीबारBaramatiबारामती