शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

पुणे महापालिकेच्या ७४० कंत्राटी वाहन चालकांचे वेतन अडकले; प्रशासकीय गोंधळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:58 PM

कोरोनाच्या काळामध्येही हे कंत्राटी चालक अविरत सेवेमध्ये कार्यरत राहिले.

ठळक मुद्देआठवडाभरात कंत्राटी वाहन चालकांचे वेतन देण्यात येणार: वाहन विभागाचे उपायुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : वाहन चालकांची भर्ती करण्यासाठीच्या निविदा काढण्यापासून त्या रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढण्याच्या गोंधळात, कोरोनाच्या साथीतही कार्यरत राहणाऱ्या सुमारे ७४० कंत्राटी वाहन चालकांना एक महिन्याचे वेतन मिळालेले नाही.      महापालिकेच्या कचरा उचलण्याच्या वाहनांपासून अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनांपर्यंत बहुतांशी ठिकाणी महापालिकेकडून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.कोरोनाच्या काळामध्येही हे कंत्राटी चालक अविरत सेवेमध्ये कार्यरत राहिले. मात्र, एक महिन्यापासून या चालकांना वेतनच मिळालेले नाही.     कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडले असतानाही महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी वाहन चालकांच्या नियुक्तीसाठी पाच वर्षांची निविदा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर हा निर्णय मागे घेऊन दोन वर्षांसाठी कंत्राट काढावे अशी सूचना काहींनी केली. यात अखेर यावर्षी तरी पुर्वीप्रमाणेच एक वर्षासाठीच निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.      या सर्व घडामोडीत जुलैमध्ये कंत्राटी वाहन चालक पुरवण्याची निविदा काढण्यात आली. यामध्ये चार ठेकेदार सहभागी झाले होते. यापैकी दोन ठेकेदार पात्र ठरले. पण अचानक ही निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सदर गोंधळात मात्र कोरोना काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सुमारे ७४० कंत्राटी वाहनचालकांचे वेतन अडकले गेले.      याबाबत पालिकेच्या वाहन विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नव्याने कंत्राटी वाहन चालक नेमण्याची निविदा काढण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच लवकरच या निविदेला मंजुरी देण्यात येऊन, साधारण आठवडाभरात सर्व कंत्राटी वाहन चालकांचे वेतन देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.               ---------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका