खुनाचा प्रयत्न करणारे सख्खे भाऊ जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:12 IST2021-05-27T04:12:00+5:302021-05-27T04:12:00+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २४ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक शिवरत्न चौकाजवळ ओढ्याच्या कडेला रवींद्र राजेंद्र दिसले ...

Sakha brothers arrested for attempted murder | खुनाचा प्रयत्न करणारे सख्खे भाऊ जेरबंद

खुनाचा प्रयत्न करणारे सख्खे भाऊ जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २४ मे रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक शिवरत्न चौकाजवळ ओढ्याच्या कडेला रवींद्र राजेंद्र दिसले (रा. श्रीपाद हाईटस, जांभुळवाडी) यांस दोन सख्ख्या अल्पवयीन भावांनी अडवून जुन्या भांडणाच्या कारणख्रून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते.

दिसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अल्पवयीन मुले असून ते धायरी येथील धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धायरेश्वर मंदिराजवळ सापळा रचून दोन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की रवींद्र राजेंद्र दिसले याने काही दिवसांपूर्वी आम्हाला मारहाण केली होती. त्याच कारणामुळे दिसले यांच्यावर कोयत्याने वार कररून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बालकांना गुन्ह्यात ताब्यात घेतले असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता यादव करत आहेत.

Web Title: Sakha brothers arrested for attempted murder