शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sahyadri Express: सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा नव्या जोमाने धावणार, स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा

By अजित घस्ते | Updated: October 14, 2023 18:29 IST

पुणे : प्रवासी गाड्यांना नवीन थांबे, विविध स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग रेल्वे फाटजाच्या जागी बदलून ...

पुणे : प्रवासी गाड्यांना नवीन थांबे, विविध स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग रेल्वे फाटजाच्या जागी बदलून भुयारी मार्ग, रोड ओव्हर ब्रिज इ. कामे  रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण, रेल्वे थांबे, प्लॅटफॉर्म विस्तार, नवीन गाड्यांचे विद्युतीकरण, स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा, एस्केलेटर, लिफ्ट, नवीन फूट ओव्हर ब्रिज, एलईडी दिवे, यूटीएस मोबाइल ॲप तिकीट प्रणाली, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयांवर शनिवारी विभागीय रेल्वे कार्यालय पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील सातारा, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण , खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी, खासदार श्रीरंग बारणे मावळ, सोलापूर खासदार  डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, लातूरचे खासदार डॉ.सुधाकर  श्रंगारे, माढा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,हातकणंगले खासदार धैर्यशील माने , उस्मानाबाद खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ ​​पवनराजे निंबाळकर इ. उपस्थित होते. या बैठकीला 24 खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. यापैकी 9 खासदार उपस्थित राहून आपल्या भागातील रेल्वे बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी आणि विविध विभागांच्या प्रमुखांसह पुणे आणि सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासमवेत विभागीय रेल्वेच्या कामकाज बाबत आढावा घेण्यात आली. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण तीनशे पेक्षा जास्त मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये  सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे