पुणे : महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त साहित्यिक कट्ट्यावर भावकवी मंगेश पाडगावकर यांच्या काव्याची ओळख उपस्थितांना करून दिली. पाडगावकर यांच्या विविधांगी कवितांचा धावता आढावा यावेळी घेण्यात आला.नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने कमला नेहरू पार्क येथे दर महिन्याला साहित्यिक कट्टा आयोजित करण्यात येते. यावेळी गदिमांच्या स्मृतीनिमित्त पाडगावकर यांच्या कवितांचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. आशा होनवाड व अपर्णा म्हैसकर यांनी त्याच्या भावकवितांचे वाचन केले. सलग साठ वर्षे सातत्याने कविता लिहिणारे पाडगावर बालकविता, प्रेमकविता,भावकविता, समाजकविता,भक्तीकविता, वात्रटिका, लघुनिबंध व नाट्य अशा अनेक क्षेत्रात संचार करते झाले. ‘सावर रे’, ‘या जगण्यावर’, ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ अशा अनेक कवितांची ओळख करून देण्यात आली. रणमर्दाच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली.सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, पाडगावकरांनी मुलांचे संवेदनाक्षम मन ओळखले होते. त्यांनी मराठी मनाला जगण्यावर प्रेम करायला शिकविले. प्रा. शाम भुर्के यांनी प्रास्ताविक केले. अनघा केसकर, अलका घळसासी, वर्षा बरिदे, माधवी केसकर, शाळीग्राम, चिटणीस आदी यावेळी उपस्थित होते.
भावकवितांमधून शब्दप्रभूचे स्मरण; गदिमांच्या स्मृतीनिमित्त पुण्यात ‘साहित्यिक कट्टा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:14 IST
महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतीनिमित्त साहित्यिक कट्ट्यावर भावकवी मंगेश पाडगावकर यांच्या काव्याची ओळख उपस्थितांना करून दिली.
भावकवितांमधून शब्दप्रभूचे स्मरण; गदिमांच्या स्मृतीनिमित्त पुण्यात ‘साहित्यिक कट्टा’
ठळक मुद्देकमला नेहरू पार्क येथे दर महिन्याला साहित्यिक कट्टापाडगावकरांनी मुलांचे संवेदनाक्षम मन ओळखले होते : माधुरी सहस्त्रबुद्धे