कोरोना संकटातील बारामतीकरांना 'साहेबां'ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:00+5:302021-04-11T04:12:00+5:30

गेल्या दोन दिवसांपासून रेमडीसेव्हर इंजेक्शनसाठी कोविड रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा ...

Saheb's help to Baramatikars in Corona crisis | कोरोना संकटातील बारामतीकरांना 'साहेबां'ची मदत

कोरोना संकटातील बारामतीकरांना 'साहेबां'ची मदत

गेल्या दोन दिवसांपासून रेमडीसेव्हर इंजेक्शनसाठी कोविड रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. कालपासून रेमडीसेव्हर गायब झाले आहे. त्यामुळे कोविड रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती स्वत: ज्येष्ठ नेते पवार यांनी जाणून घेतली.

त्यांनी तातडीने ४८० इंजेक्शन्स विनामूल्य वितरीत करीत बारामतीकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी देखील पवार यांनी हे इंजेक्शन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले होते. बारामतीतही रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर येथील डॉक्टर हतबल झालें आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून आलेल्या ४८० इंजेक्शन्सचे योग्य पद्धतीने अति गरजू रुग्णांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या कोविड रुग्णांचा स्कोअर जास्त आहे, वयोवृध्द व महिलाना ही इंजेक्शन्स आज विनामूल्य देण्यात आली. बारामतीकरांना या इंजेक्शन्सचा तुटवडा भासू नये यासाठी अजित पवार यांच्या पाठोपाठ थेट शरद पवार यांनीच आता लक्ष घातले आहे.

Web Title: Saheb's help to Baramatikars in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.