साहेब दोन हजार तरी द्या! बहीण दवाखान्यात आहे - ‘भावा’ची आर्त विनवणी

By Admin | Updated: November 17, 2016 01:43 IST2016-11-17T01:43:29+5:302016-11-17T01:43:29+5:30

माझी बहीण दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. तिच्या उपचाराला पैशांची लय गरज आहे. घरात दुसरं कोणी नाही म्हणून मी मुंबईवरून आलो आहे.

Saheb give two thousand! The sister is in the hospital - 'brother' entreats | साहेब दोन हजार तरी द्या! बहीण दवाखान्यात आहे - ‘भावा’ची आर्त विनवणी

साहेब दोन हजार तरी द्या! बहीण दवाखान्यात आहे - ‘भावा’ची आर्त विनवणी

सोमेश्वरनगर : माझी बहीण दवाखान्यात अ‍ॅडमिट आहे. तिच्या उपचाराला पैशांची लय गरज आहे. घरात दुसरं कोणी नाही म्हणून मी मुंबईवरून आलो आहे. माझ्याकडेही अजिबातच पैसे नाहीत. साहेब काय बी करा....पण दोन हजार तरी द्या, अशी विनवणी खंडोबाचीवाडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रशांत लकडे जिल्हा बँक अधिकाऱ्यांना करत होता. हे पाहून अगादेरच पैशांच्या तुटवड्यामुळे अडचणीत सापडलेले बँक अधिकारी निरुत्तर होत होते.
लकडे यांची बहीण दीपाली लकडे यांचे पासबुक होते. दीपाली लकडे सद्या, नीरा, ता. पुरंदर येथील हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असून, प्रशांत हा सोमेश्वर येथील दीपालीच्या खात्यावरील दोन हजार रुपये काढण्यास आला होता. पैसे न मिळल्याने तो हताश झाला होता. पैसे मिळावेत म्हणून तो बँक कर्मचाऱ्यांना वारंवार विनवण्या करीत होता. साहेब काही करा, फुटका रुपया खिशात नाही. बहीण दवाखान्यात आहे. मेडीकलला पैसे नाहीत, रक्त तपासणीसाठी पैसे लागतात, सोनोग्राफीला पैसे लागतात, काय करू मी सांगा... अशा प्रकारच्या विनवण्या तो आधिकाऱ्यांना करीत होता. परिस्थितीचे भान ओळखून शाखा व्यवस्थापक गायकवाड यांनी त्याला दोन हजार रुपये मिळवून दिले. जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे. तसेच सोमेश्वरनगर येथील पुणे जिल्हा बँकेत १२ आणि १३ तारखेला तर पैसेच नव्हते. दि. १४ रोजी सोमेश्वर शाखेकडे ६ लाख रुपये आले. तेही सर्व दोन हजारांच्या नोटा. यातील सोमेश्वर शाखेने मुरूम शाखेला एक लाख आणि निंबुत शाखेला एक लाख दिले. सोमेश्वर शाखेने दि. १४ रोजी शंभर खातेदारांना प्रत्येकी फक्त दोन हजार रुपये याप्रमाणे दोन लाख रुपयांचे वाटप केले. तर, दि. १५ रोजी प्रत्येकी दोन हजार प्रमाणे दोन लाखाचे वाटप
केले. हातात दोन हजाराची नोट मिळूनही ग्राहकांना त्यांचा लगेच उपयोग होत नव्हता. त्याचा पुढील प्रवास सुरू व्हायचा तो सुट्टे मिळविण्यासाठी. दिवसाला ग्राहकांची मागणी १५ ते २० लाखांची असताना बँकेला अवघ्या दोन लाख रुपयांवर भागवावे लागत आहे. आज सकाळी बँक उघडल्यावर पैशांसाठी एकच झुबड उडाली. मात्र, अवघ्या अर्धा तासातच दोन लाख रुपये संपले. मात्र, पैसेच संपल्याने बँक प्रशासनाने राहिलेले पासबुक परत देण्यास मदत केली. (वार्ताहर)

Web Title: Saheb give two thousand! The sister is in the hospital - 'brother' entreats