पतंगाचा दोरा हवा सुरक्षित हाती
By Admin | Updated: January 10, 2017 03:47 IST2017-01-10T03:47:24+5:302017-01-10T03:47:24+5:30
मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून

पतंगाचा दोरा हवा सुरक्षित हाती
पुणे : मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा व अपघात टाळा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा आहे. संक्रांतीदरम्यान अनेक नागरिक आणि लहान मुले पतंग उडवतात. अनेकदा पतंग या वीजवाहिन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणेत अडकतात. वीजप्रवाह सुरू असताना वाहिन्या, रोहित्रांमध्ये अडकलेले पतंग काढण्यासाठी जाणते अजाणतेपणी धोका पत्करला
जातो.
त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते. याशिवाय अडकलेल्या पतंगाच्या मांज्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. यामुळेदेखील एखादा अपघात होऊ शकतो. (प्रतिनिधी)
४नागरिक व विशेषत: लहान मुलांनी वीजवाहिन्या तसेच वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पतंग उडविताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. वीजयंत्रणमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजप्रवाह सुरू असलेल्या वीजयंत्रणेपासून दूर अंतरावर पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.