शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साधू वासवानी मिशनचे दादा वासवानी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 12:53 IST

साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे अाज पुण्यात निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे.

पुणे : शाकाहारासाठी देशविदेशात प्रचार करणारे साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा वासवानी यांचे गुरुवारी (12 जुलै) सकाळी 9.01 वाजण्याच्या सुमारास अल्पशा अाजाराने निधन झाले. ते 99 वर्षांचे हाेते. येत्या 2 अाॅगस्ट राेजी त्यांचा शंभरावा वाढदिवस हाेता.  तीन दिवसांपूर्वी दादा वासवानी यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्यानंतर त्यांना घरीही अाणले हाेते. मात्र अाज सकाळी त्यांची प्राणज्याेत मालवली. सदैव प्रसन्न असणाऱ्या दादा वासवानी यांनी संपूर्ण अायुष्य शाकाहारीचा प्रचार केला.

त्यांनी इंग्रजीमध्ये 68, कथासंग्रह 16, हिंदीत 19, सिंधीमध्ये 5, मराठीमध्ये 7, कन्नड 5, तेलगू 3, अरेबियन 2, चायनिज 1, डच 1, बहासा 4, स्पँनिस 12, गुजरातीमध्ये 1, ओरिया 5, रशियन 1, तमिळ९ , लँटवियन 1 पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अाध्यात्मिक गुरु म्हणून अाेळखले जायचे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांच्या 99 व्या वाढदिवसानिमित्त व्हिडीअाे काॅन्फरन्स तर्फे संवाद साधत दादा वासवानी यांना शुभेच्छा दिल्या हाेत्या. त्यावेळी दादा वासवानी हे विनम्रतेचे प्रतीक असून ते भारतीय संत परंपरेतील या पिढीचे संत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते.

दादा जे पी वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी आणि वडिलांचे नाव पेहेलाजराय होते.  पेहेलाजराय हे पेशाने हैद्राबाद ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक होते. दादा वासवानी यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद (पकिस्तान) येथे टी सी प्रायमरी स्कूल मध्ये झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मिशनमध्ये ठेवण्यात अाले अाहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूnewsबातम्या