साधू - साध्वींचे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम
By Admin | Updated: February 3, 2017 21:32 IST2017-02-03T20:40:53+5:302017-02-03T21:32:16+5:30
जैन स्थानकवासी संघाचे प्रवर्तक कुंदनमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रमुनीजी महाराज आदी 50 साधू - साध्वींचे आगमण झाले

साधू - साध्वींचे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम
ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 3 - जैन स्थानकवासी संघाचे प्रवर्तक कुंदनमुनीजी महाराज, युवाचार्य महेंद्रमुनीजी महाराज आदी 50 साधू - साध्वींचे आगमन झाले असून, तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महेंद्र मुनी महाराज यांच्या 36 व्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून युवक - युवती संमेलन, नवीन स्थानक भवनचे भूमिपूजन आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
युवक संमेलनासाठी मध्य प्रदेशचे आय.ए.एस. आधिकारी सुधीर कोचर हे आजच्या युवा पिढीकडून अपेक्षा व निश्चय याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत . उद्योजक रसिक लाल धाडीवाल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष शशिकांत जैन, प्रांतीय युवा अध्यक्ष आदेश खिंवसरा, सागर सांकला आदी उपस्थित राहणार आहेत .
महेंद्र मुनीजी महाराज यांचे चाकण हे जन्मगाव असून, पद स्वीकृतीनंतर ते प्रथमच चाकण येथे आले आहेत. ३६ वर्षांपूर्वी वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी दीक्षा ( संसारी जीवनाचा त्याग ) घेतली होती. युवाचार्य पद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच आपल्या जन्मभूमी चाकण येथे आले आहेत .