शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

अरे देवा, भेदरलेल्या तरुणीला पोलीस चौकीत कडी लावून बसावं लागलं!

By प्रमोद सरवळे | Published: June 27, 2023 7:07 PM

सदाशिव पेठेत भरदिवसा थरार; ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर कोयत्याने हल्ला

पुणे : आज भरदिवसा पुण्यात एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने वार केले. त्यामध्ये ही तरुणी जखमी झाली आहे. ज्यावेळी त्या तरुणीवर हल्ला झाला त्यावेळी रस्त्यावरील काही लोक मधे आले म्हणून ती तरुणी वाचू शकली. या घटनेनंतर त्या तरुणीची भेदरलेली अवस्था पाहून तिला काहीजण जवळील पेरूगेट पोलीस चौकीत घेऊन गेले. पण दुर्दैव हे की त्या चौकीत एकही पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी नव्हता. त्यामुळे त्या मुलीची अवस्था पाहून आणि घटनेचे गांभीर्य पाहून तरुणीसोबत असणाऱ्यांनी चौकीत आतून कडी लावून घेतली. जर पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील पोलीस चौकीत असे पोलिस कर्मचारी नसतील तर सामान्यांनी अडचणीच्यावेळी जायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्यावेळी जखमी तरुणीला पोलीस चौकीत आणले त्यानंतर तब्बल अर्धा तासाने पोलीस तिथे आले नंतर कडी उघडली असे तिच्यासोबत असणाऱ्यांनी सांगितले. याबद्दल पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्हाला घटनेनंतर तिथल्या काही लोकांनी फोन केले, त्यानंतर ५ ते ७ मिनिटांत पोलिस कर्मचारी चौकीजवळ पोहचले. ज्या ठिकाणी हल्ला झाला होता तिथून पेरुगेट पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे.

"आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले"

मी दुकानामध्ये काम करत होतो. माझं लक्ष अचानक एका मुलीकडे गेलं. ती मुलगी पेरुगेट पोलिस चौकीच्या दिशेने पळत आली. तिच्या मागे एक मुलगा पळत आला. त्याच्या हातात कोयता होता. ती मुलगी पळत असताना अंबिका स्वीट होम जवळ पाय घसरून पडली. त्याने त्या मुलीवर वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी तिने हात आडवा केला. तर कोयत्याचा वार हातावर झाला. हे दिसताक्षणी मी धावत तिथे गेलो. माझ्या सोबत एक मुलगा होता. त्याने त्या मुलाला पकडले. तोपर्यंत लोकांचा जमाव आला. लोकांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. इतका मार खाऊन सुद्धा तो उठून तिला मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्या मुलीला धीर देत पोलिस चौकीमध्ये नेले. तेथे कोणी नव्हते. मग आम्ही पोलिस चौकीचे दार आतून लावून घेतले. काही वेळाने पोलिस तेथे पोहचले, असं प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.

घटनेनंतर पुणे शहरात खळबळ-

याबाबत २१ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सदाशिव पेठेतील स्वाद हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहुल हंडोरे याने खून केल्याची घटना नुकतीच घडली. राहुलने दर्शनाकडे विवाहाबाबत विचारणा केली होती. दर्शनाने त्याला झिडकारले होते. त्यानंतर त्याने दर्शनाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने राजगड किल्ला परिसरात नेऊन खून केल्याची घटना १२ जून रोजी घडली होती. त्यानंतर सदाशिव पेठेत मंगळवारी ही घटना घडली. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मंडई पोलीस चौकी आणि पेरुगेट पोलीस चौकीसाठी मनुष्यबळ कमी आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मार्शल आणि अंमलदार मंडई पोलीस चोकीकडे होते. घटनेनंतर ५ ते ७ मिनिटांत पोलीस तिथे पोहचले होते. 

-दादा गायकवाड (पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग विश्रामबाग पोलीस स्टेशन)

 

टॅग्स :Puneपुणेsadashiv pethसदाशिव पेठPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी