शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सैनिकांसाठी पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:48 IST

देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया सैनिकांचे कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना

पुणे : देशाच्या सीमेचे रक्षण करणाºया सैनिकांचे कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाºया पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी २५ हजारहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.भारतमाता की जय... च्या जयघोषात ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या राख्यांचे पूजन मोठ्या उत्साहात झाले.सैनिक मित्र परिवारातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी आणि पारंपरिक वेशात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, संगीता ठकार, कल्याणी सराफ, गंधाली पोटफोडे, माला रणधीर, विनया देसाई, स्वाती ओतारी, आनंद सराफ, राजू पाटसकर, संदीप ढवळे, अनिल पानसे, अ‍ॅड. बिपीन पाटोळे, कुमार रेणुसे आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, पत्र व राख्या या वेळी पाठवण्यात आल्या.कुलकर्णी म्हणाल्या, ‘सैनिक हो तुमच्यासाठी... हे गाणे ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. परंतु पुण्यामध्ये या सैनिकांची आठवण ठेवत आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. सैनिक देशवासीयांचेरक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम व संवेदना प्रत्येक भारतीयाच्यामनात असायला हवी. देशवासीयांनी त्यांच्यासोबत साजºया केलेल्याअशा सणांमधून सैनिकांना बळ मिळणार आहे.’