एस. एम. गवळी यांची सहसचिवपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:07+5:302021-07-28T04:10:07+5:30
कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ ...

एस. एम. गवळी यांची सहसचिवपदी निवड
कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिवपदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. गवळी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर विद्यालयात पुणे विभागातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी सुभाष काळभोर बोलत होते. प्राचार्य एस. एम. गवळी हे संस्थेचे पुणे विभागप्रमुख व आजीव सेवक म्हणूनही काम पाहत आहेत.
या वेळी सत्काराला उत्तर देताना एस. एम. गवळी म्हणाले, डाॅ. बापूजी साळुंखे यांनी घालून दिलेल्या मार्गावरचा मी एक प्रामाणिक वाटाडी आहे. संस्थेने दिलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीष कुमदाळे यांनी तर, आभार कल्पना बोरकर यांनी मानले.