शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Pune | शिवणेमध्ये भरधाव कारची बसला धडक; कारवरील ताबा सुटल्याने अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:40 IST

रात्रीच्या वेळी रस्ता चुकल्यामुळे कार वळवत असताना अपघात...

शिवणे (पुणे) : शिवणे येथील ॲड मार्ट मॉल समोर गुरुवारी रात्री कार आणि बसची धडक झाली. या भीषण धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्रीच्या वेळी रस्ता चुकल्यामुळे कार वळवत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटून बसला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापूरकर, हेड कॉन्स्टेबल अनिल मते त्वरित घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी पुढील कारवाई केली.

गणपती माथा ते उत्तमनगर या भागात रस्ता रुंदीकरण केल्यापासून येथे भरधाव वाहनांचे अनेक अपघात घडल्याचे निदर्शनात आले आहे. प्राथमिक शाळा, विद्यालय आणि नेहमीच गजबजलेल्या ह्या परिसरात कोठेही गतिरोधक नसल्याने वाहने गतीने चालवून अपघात होत आहेत. स्थानिकांनी अनेकवेळा गतिरोधक बसविण्यासाठी निवेदने दिली असली तरी देखील काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात