‘व्हॅलेंटाइन डे’ खरेदीसाठी तरुणाईची गर्दी
By Admin | Updated: February 14, 2017 01:47 IST2017-02-14T01:47:34+5:302017-02-14T01:47:34+5:30
मंगळवारी (दि. १४) साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात व्यापारी वर्गाने जय्यत तयारी केली आहे.

‘व्हॅलेंटाइन डे’ खरेदीसाठी तरुणाईची गर्दी
बारामती : मंगळवारी (दि. १४) साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात व्यापारी वर्गाने जय्यत तयारी केली आहे. या तरुणाईचा दिन साजरा करण्यासाठी विविध वस्तूंनी दुकाने गजबजली आहेत. ‘गिफ्ट’ खरेदीसाठी शहरामध्ये तरुणाईची गर्दी होत आहे. प्रेमाचा संदेश देणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये ‘चांगलीच क्रेझ’ आहे. यंदा बाजारात प्रेमाचा संदेश देणारा स्क्र ोल, एलईडी टेडी,लव्ह बुक आकर्षण ठरले आहे.
मागील वर्षापर्यंत लाल, मार्सला, गुलाबी रंगाभोवती फिरणारा हा उत्सव आता ‘रेड ’ रंगात बुडाला आहे. यंदा या रंंगाची के्रझ आहे. यंदा बाजारात मिनियन सॉफ्ट टॉईज आकारातील विविध वस्तू लहान, तरुण वर्गापासून ज्येष्ठांपर्यंत आकर्षण ठरत आहे. प्रेम व्यक्त करणाऱ्या टेडी ३० रुपयांपासून ७ हजार रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्ये ५ फूट उंचीचा सात हजार रुपये किमतीचा टेडी युवा वर्गामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या महागड्या टेडीला मागणी असल्याचे विक्रेते राजू आहेरकर यांनी सांगितले. यंदा तरुणाईसाठी ‘हर्ट लाईट टेडी’ प्रथमच उपलब्ध झाला आहे. प्रेमाचा संदेश देणाऱ्या या टेडीचे चांगलेच आकर्षण आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा ‘डे’ साजरा करण्यात मशगुल आहेत.‘प्रपोज डे’, ‘प्रॉमिस डे’,‘चॉकलेट डे’,‘टेडी डे’,‘हग डे’आदी विविध दिवस साजरे करण्यात आले आहेत. आता तरुणाईला ‘व्हॅलेंटाइन डे’ची प्रतीक्षा आहे. शहरात विविध दुकानांमध्ये ‘मॅजिक’अंडे, कपल शो पीस, मिनियन कार्टुन, टेडी चॉकलेट,डान्सिंग टेडी, व्हिजिट बॉक्स, मॅग्नेटिक टेडी, क्रिस्टल किचन, लेडिज वॉलेट, शोपीस, पेअर टेडी, कॉफी मग, म्युझिकल बास्केट, सॉफ्ट टॉईज, हार्टशेप पिलो, चॉकलेट बुुके, परफ्युम, वॉलेट, लेडिज पर्स, कोलाज फोटो फे्रम, घड्याळे, किचेन, पेन, गिफ्ट, टेडी, चॉकलेट, भेट कार्ड, लखोटा, ब्रेसलेट, गळ्यातील चेन आदी वस्तू विक्रीला मांडण्यात आल्या आहेत. हार्ट शेपमधील पिलो, सॉफ्ट टॉईजमधून ‘आय लव्ह यू’ हा ध्वनीमुद्रित केलेला संदेश आहे़