शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पुण्यात मार्केट यार्डमध्ये भाज्या खरेदीसाठी एकच गर्दी ; पोलिसांना करावे लागले पाचारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 10:18 IST

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे.

पुणे :एकीकडे प्रशासन लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करून थकले असताना मंगळवारी  पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र एकच गर्दी बघायला मिळाली. उद्या (दि.२५पासून) ३१ मार्चपर्यंत बाजार समिती बंद असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर ही गर्दी कमी न होता वाढताना दिसल्याने पोलिसांना बोलवावे लागले. सध्या गर्दी पांगली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. 

अधिक माहिती अशी की, पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सध्या ३१ इतकी आहे. त्यापैकी १९ रुग्ण पुणे तर १२ रुग्ण पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता.त्यामुळे पुणे प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष काळजी घेताना दिसत आहे. इतकेच नव्हे राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व नागरी व्यवहार मंदावले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. तसेच जिल्हा अंतर्गत सीमाही बंद करण्यात आल्या असून लोकांना जास्तीत जास्त घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित एकदिवसीय जनता कर्फ्यू वगळल्यास नागरिकांनी पुन्हा घराबाहेर पडण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अखेर कलम १४४नुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

पुण्यातही काहीशी अशीच स्थिती असून आपत्कालीन सेवा वगळता पीएमपी बस सेवा, सर्व बाजारपेठा, दुकाने, सेवा बंद आहेत. इतकेच नव्हे तर तीन दिवसांनंतर उघडण्यात आलेले मार्केट यार्ड काल आणि आजनंतर पुन्हा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय आडते असोशिएशनने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी मार्केट यार्डला एकच गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. सुरुवातीला सर्व व्यवहार हा शांततेत सुरु होता. मात्र लोकांची गर्दी वाढल्याने  घटनास्थळी पोलिसांनी पाचारण करावे लागले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून टप्प्याटप्प्याने लोकांना आत सोडले जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्डPoliceपोलिस